आरोपीने २६ ऑगस्टला शाळेच्या मैदानाशेजारील खोलीत पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केल्याने मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
मुंबई । नगर सह्याद्री
पूर्व उपनगरातील एका इंटरनॅशनल शाळेमध्ये क्रिकेट शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीला क्रिकेट प्रशिक्षणातून काढून टाकण्याची धमकी देऊन त्या अल्पवयीन तरुणीसोबत शिक्षक अश्लील चाळे करत होता.
क्रिकेट शिक्षक मूळ औरंगाबादचे स्थायिक असून ३३ वर्षीय आहेत. या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला असून देवनार पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीने २६ ऑगस्टला शाळेच्या मैदानाशेजारील खोलीत पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केल्याने मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
पालकांनी देवनार पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. याप्रकरणी, देवनार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.
COMMENTS