चंद्रशेखर खुशाल कुत्तरमारे ( ३५ ) असे मृत मजुराचे नाव असून ते स्थानिक जैतपूर येथे गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेले होते.
भंडारा । नगर सह्याद्री
लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे गजानन महाराजांच्या मंदिराचा सुरक्षा गेट लावत असताना मजुराला विजेचा जोरदार झटका बसला. या घटनेमध्ये मजुर कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
चंद्रशेखर खुशाल कुत्तरमारे ( ३५ ) असे मृत मजुराचे नाव असून ते स्थानिक जैतपूर येथे गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेले होते. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी गेट लावत असताना विजेचा धक्का लागल्याने चंद्रशेखर जखमी झाला.
घटनेची माहिती गावकऱ्याला मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चंद्रशेखर याला उपचारासाठी तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.
COMMENTS