काही दिवसनपूर्वीच किशोर भिसे यांची पाथरी नगर परिषद येथून बदली होऊन सोनपेठला बदली झाली होती.
परभणी । नगर सह्याद्री
परभणी जिल्ह्यामधील सोनपेठ नगर परिषदेचे लेखापाल यांनी राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किशोर भिसे असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे.
आत्महत्या करण्यापाठीमागील कारण अद्याप समोर आले नाही. काही दिवसनपूर्वीच किशोर भिसे यांची पाथरी नगर परिषद येथून बदली होऊन सोनपेठला बदली झाली होती. घटनेची माहिती घरामधील व्यक्तींना समजल्यावर घरामधील व्यक्तीने हंबरडा फोडला.
घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांना मिळाल्यावर त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या अधिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
COMMENTS