याप्रकरणी प्रणव कुमार चक्रवर्ती (वय ५५, रा.एकतानगर, लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे । नगर सह्याद्री
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन तरुणीचे फिंगर प्रिंट घेण्याच्या नावाखाली विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रणव कुमार चक्रवर्ती (वय ५५, रा.एकतानगर, लोहगाव) याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. लोहगावमधील १७ वर्षांच्या तरुणीने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. घडलेला प्रकार शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान लोहगावमधील पोस्ट ऑफिसमध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेली असता आरोपीने फिर्यादीची फिंगर प्रिंट घेताना शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चक्रवर्ती याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS