बॉलिवूडमधील सर्वांच्या आवडतं आणि यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. हे कपल प्रेक्षकांना फक्त ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन देखील खूप आवडत
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबई | बॉलिवूडमधील सर्वांच्या आवडतं आणि यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. हे कपल प्रेक्षकांना फक्त ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन देखील खूप आवडते. हे कपल नेहमी चाहत्यांचे मन जिंकत असते. नुकताच एका कार्यक्रमात रितेश आणि जेनेलिया यांनी एकत्र हजेरी लावली. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जेनेलिया तिसर्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशामध्ये आता रितेश देशमुखने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
रितेश देशमुखने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. जेनेलिया प्रेग्नेंट असल्याबाबत बातमी व्हायरल होत आहे ती या पोस्टमध्ये शेअर करत त्यावर कमेंट केली आहे. यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, ’मला आणखी २-३ मुलं चालली असती. पण दुर्दैवाने हे असत्य आहे.’ या इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून रितेश देशमुखने जेनेलियाच्या तिसर्या प्रेग्नेंसीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जेनेलिया प्रेग्नेंट नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शनिवारी रितेश आणि जेनेलिया एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी दोघेही यूट दिसत होते. रितेशने निळ्या रंगाच्या पँटसह पांढर्या रंगाचे शर्ट तर जेनेलियाने जांभळ्या रंगाचा डीप नेक शॉर्ट वनपीस घातला होता. त्यावर तिने गोल्डन कानातले आणि गोल्डन हिल्सने तिने आपला लूक परिपूर्ण केला होता. जेनेलियाने केस मोकळे सोडले होते. या लूकमध्ये जेनेलिया इतकी सुंदर दिसत होती की सर्वांच्या नजरा तिच्याकडेच होत्या.
COMMENTS