नवी दिल्ली / नगर सह्याद्री जी २० कार्यक्रमाच्या सांगता करतेवेळी गुरुवारी एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलंय. त्या परिसरातील एका पंचतारांक...
नवी दिल्ली / नगर सह्याद्री
जी २० कार्यक्रमाच्या सांगता करतेवेळी गुरुवारी एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलंय. त्या परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडलायचे समजते.
हा अजब प्रकार घडल्यानंतर गुप्तचर यंत्रणांचाही काही काळ गोंधळ उडाला होता. त्याचे झाले असे की, हॉटेल ताज पॅलेसमध्ये चीनहून आलेल्या शिष्टमंडळाच्या एका सदस्याने एक बॅग आणली होती. पोलिसांनी जेव्हा या बॅगची तपासणी करायला सांगितली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला.
खूप वेळ सुरक्षा रक्षकांनी चीनी व्यक्तीची समजूत काढली. बॅग चेक करणे आवश्यक असल्याचे सांगितले परंतु त्याने काही ऐकले नाही. बॅग चेक करण्यावरून सुरक्षा रक्षक आणि चीनी व्यक्तीमध्ये गोंधळ झाला.
त्यानंतर तो चीन एम्बेसीमध्ये परतला. पोलिसांच्या माहितीनुसार, या व्यक्तीनंतर जो कुणी व्यक्ती आले त्यांच्या सगळ्यांच्या बॅगा चेक केल्या गेल्या. परंतु त्या चीनी व्यक्तीच्या बॅगमध्ये काय आहे हे स्पष्ट झाले नाही. जवळपास १२ तास तणाव कायम होता.
अखेर संशयास्पद बॅग चीनी दूतावासाकडे पाठवण्यास ते तयार झाले. प्रायव्हेट इंटरनेट मागितले परंतु ते हॉटेलने नाकारले. चीनी सूटकेसचे अखेरपर्यंत रहस्य बनून राहिले. विशेष म्हणजे जी २० शिखर संमेलनासाठी येणारे ब्राझीलचे राष्ट्रपती याच हॉटेलमध्ये थांबले होते.
COMMENTS