घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
लखनऊ । नगर सह्याद्री
उत्तर प्रदेशच्या कौशंबी येथे तिहेरी हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये संदीपन घाट क्षेत्राजवळ असलेल्या गावात रात्रीच्या सुमारास वडील, मुलगी आणि जावयाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण गावामध्ये खळबळ माजली आहे. परंतु गावामधील नागरिकांनी संतापल्यामुळे आरोपींच्या घराला आग लावली आहे.
घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली. जमिनीच्या वादामधून हत्याकांड झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या हत्याकांडामधील आरोपीला लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबाचा आणि शेजाऱ्यांचा जमिनीसदंर्भात वाद होता. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्याने आरोपीने कुटुंबावर हल्ला केला. ते जमिनीवर कोसळेपर्यंत आरोपी त्यांना मारहाण केली.
COMMENTS