केदारच्या आंघोळी-पाण्यापासून ते औषधोपचारापर्यंत वडिल करत असल्याने उतारवयात मुलाला सांभाळताना त्यांची दमछाक सुरू होती.
कोल्हापूर । नगर सह्याद्री
पिग्मी गोळा करून गतिमंद मुलाचे संगोपन करणाऱ्या वडिलांनी कीटकनाशक प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेला प्रकार दिलीप शंकरराव जाधव ( ६० ) यांचा शनिवारी सकाळी सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मुलगा ( २६ ) केदार याला दम लागत असल्याने सीपीआरमध्ये दाखल केले, असता शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
चार पूर्वीने दिलीप जाधव यांच्या पत्नीचे निधन झाले होते. दोन मुली विवाहित असून त्यांचा एक केदार हा गतिमंद मुलासह ते चंद्रेश्वर गल्लीत राहत होते. केदारच्या आंघोळी-पाण्यापासून ते औषधोपचारापर्यंत वडिल करत असल्याने उतारवयात मुलाला सांभाळताना त्यांची दमछाक सुरू होती. तरीही जणू काही मुलासाठीच जगत व त्यांच्यासोबत फिरत असत.
कीटकनाशक प्राशन करून त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु मुलगा केदार याच्या मृत्यूचे देखील कारण स्पष्ट नाही, परंत्तू व्हीसेराचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
COMMENTS