आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निघोज परिसरात १८ ते २० गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणपतीची सवाद्य मिरवणूक काढत पूजा करण्यात आली.
निघोज | नगर सह्याद्री
आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निघोज परिसरात १८ ते २० गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणपतीची सवाद्य मिरवणूक काढत पूजा करण्यात आली. दुपारपर्यंत मुहूर्त असल्याने मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच घरगुती गणेश प्रतिष्ठापनेसाठी लगबग दिसत होती. यावेळी भाविकांनी पावसासाठी साकडे घातले.
मंडळांच्या वतीने आरास बनवण्याचे काम सुरु होते. यंदा पाऊस अत्यल्प असल्याने उत्साह कमीच आहे. बाजरपेठ देखील शांत आहे. याचा परिणाम वर्गणीवर देखील पाहायला मिळाला. मंडळांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
कन्हैया दूध उद्योग समूह गणेश मंडळ, युवा साईधाम गणेश मंडळ, बालगोपाल गणेश मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा गणेश मंडळ, मुलिका गणेशोत्सव मंडळ, साईधाम गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, खंडोबा देवस्थान ट्रस्ट गणेश मंडळ, आपला गाव गणपती गणेश मंडळ, संघर्ष तरुण गणेश मंडळ, वरदविनायक गणेश मंडळ, वाघजाई गणेश मंडळ, गोरोबाकाका गणेश मंडळ, भैरवनाथ गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, दिक्षांत नगर गणेश मंडळ, गुरुदत्त गणेश मंडळ, पालखी विसावा परिसर, जय बजरंग गणेश मंडळ, लामखडे, वरखडे वस्ती गणेश मंडळ, मोरवाडी, शिववाडी गणेश मंडळ आदींनी गणेश प्रतिष्ठापना केली आहे.
COMMENTS