रामा ठाकरे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
यवतमाळ । नगर सह्याद्री
जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी शेतामध्ये गेलेल्या शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घडलेली घटना रविवारी सकाळी ७:३० च्या दरम्यान डोंगरखर्डा (ता.कळंब) येथे घडली आहे.
रामा पांडुरंग ठाकरे (५१) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याकडे शेळीपालनाचा व्यवसाय असल्याने चारा आणण्यासाठी शेतामध्ये गेला होता. झाडावर चढून पाला तोडल असताना जमिनीवरून खाली ते पडले. गावकऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रामा ठाकरे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यवतमाळला घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला. रामा यांच्या मृत्यूमुळे तालुक्यातील गावामध्ये शोककळा पसरली आहे.
COMMENTS