लाखो रुपये खर्च करून, टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्यायी मार्ग नाही.
नाशिक । नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपूर्वी टोमॅटो २०० रुपये किलोवर गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली. परंतु टोमॅटोचा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. शुक्रवारी टोमॅटोला अवघा दोन रुपये किलो असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे.
गुजरात, हरयाणा, हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका, आदी भागांत टोमॅटोची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते, परंतु भाव नसताना मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेल्या टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्याला मोबदला मिळत नाही.
लाखो रुपये खर्च करून, टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे मजुरी सुटणेही अवघड झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
COMMENTS