आपल्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या अभिनेत्री उर्फी जावेदचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबई | आपल्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या अभिनेत्री उर्फी जावेदचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. उर्फीने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले. नेहमी तोकडे, फाटलेले आणि विचित्र कपड्यांमध्ये घराबाहेर पडणारी उर्फी यावेळी पारंपारिक लूकमध्ये दिसली. उर्फीचा हा सोज्वळ लूक पाहून सर्व आश्चर्यचकीत झाले. गणेशोत्सवानिमित्त उर्फीने सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाची पूजा केली. यावेळी तिच्यासोबत अभिनेता प्रतीक सेजपालही होता.
दोघांनी बाप्पाचे दर्शन घेत पूजा केली. उर्फीने यावेळी लाल एम्ब्रॉयडरी कुर्ता आणि पलाझो परिधान केला होता. यावर तिने लाल रंगााच एम्ब्रॉयडरी केलेला दुपट्टा कॅरी केला होता. या ड्रेसमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत होती. उर्फीने ड्रेससोबत स्टायलिश सोनेरी रंगाचा चष्मा घातला होता. उर्फीने मंदिरामध्ये जाण्यासाठी परिधान केलेला हा पोशाख पाहिल्यानंतर चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.उर्फी जावेदचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.
दरम्यान, ’बिग बॉस’ फेम उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज नवनवीन विचित्र आणि हटके लूक करत उर्फी जावेद सर्वांना चकीत करत असते. आपल्या या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे ती ट्रोल देखील होत असते. कधी काचा, कधी खेळण्यातल्या कार, कधी मोबाईलचे सिमकार्ड, कधी प्लास्टिकपासून तयार केलेले कपडे परिधान करून उर्फी कॅमेर्यासमोर येत असते. अशामध्ये आज सिद्धिविनायक मंदिरात आलेल्या उर्फीचा संस्कारी लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
COMMENTS