उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव, अंमलदार संतोष सोनवणे, देवीदास काळे, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड यांनी आरोपीला रंगेहाथ पकडले.
छत्रपती संभाजीनगर । नगर सह्याद्री
तलाठी परीक्षेत कर्मचारी परीक्षार्थींशी हातमिळवणी करून उत्तरे पुरवतात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रॅकेट चालविणाऱ्यांकडून तीन लाख रुपयांचा दर ठरवला होता. राजू भीमराव नागरे (२९) यांना मंगळवारी चिकलठाण्यातील आयऑन सेंटर बाहेर रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यापूर्वी वनरक्षक परीक्षेमध्ये केंद्रावरीलच कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे.
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर नागरे थांबले होते. त्यानंतर त्याला पकडल्यावर त्याच्या मोबाइलमधील टेलिग्रामवर तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे ३४ प्रश्नांचे उत्तरे सापडले. सकाळच्या परीक्षेतील अंकुश जाधव (रा. कातराबाद) या उमेदवाराला त्याने उत्तरे पुरवली असल्याचे त्यांनी कबुली दिली. तर सायंकाळी एका उमेदवाराला तो त्याच प्रकारे उत्तरे होते. उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव, अंमलदार संतोष सोनवणे, देवीदास काळे, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड यांनी आरोपीला रंगेहाथ पकडले.
केंद्रातून पेपर प्राप्त झाल्यानंतर त्याची उत्तरे ते केंद्रावरील कर्मचाऱ्याला पाठवल्यानंतर तो कर्मचारी संबंधित परीक्षार्थीला पुरवतो. यासाठी तो कर्मचारी तीन लाख रुपये घेणार होता, अशी धक्कादायक माहिती नागरेच्या चौकशीत उघडकीस आली. जवळपास सात आरोपींचे हे रॅकेट असून या प्रकरणाचा तपास निरीक्षक गाैतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
COMMENTS