राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे खुपते तिथे गुप्तेमध्ये सहभागी झाल्या होत्या.
मुंबई । नगर सह्याद्री
खुपते तिथे गुप्ते हा अधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला पहिल्या दोन पर्वांनंतर आता तिसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांकडून अधिक पसंती मिळते. या कार्यक्रमाचे प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असून खुपते तिथे गुप्तेमध्ये सेलिब्रिटींबरोबरच अनेक राजकीय नेतेही उपस्थिती दर्शवतात.
अवधूत त्याच्या खास शैलीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांना बोलते करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे खुपते तिथे गुप्तेमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. या कार्यक्रमामधील सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुळे यांना व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या भावुक झाल्या होत्या. परंतु सध्या दुसरा व्हिडिओ समोर आला आहे.
यामध्ये अवधूत गुप्ते यांनी सुळेंना उपमुख्यमंत्र्यांबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे? अजित पवार की देवेंद्र फडणवीस? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारल्यावर त्यांनी कोणताही विचार न करता अजित पवारांचं नाव घेतलं.
COMMENTS