जेवणानंतर काय करावे? काय करु नये? तुम्ही काय टाळावं हे आज तुम्हाला समजणार आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
आजकालच्या धावपळीच्या जीवनात छोट्या छोट्या चुकांमुळे आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे जेवणानंतर काय करावे? काय करु नये? तुम्ही काय टाळावं हे आज तुम्हाला समजणार आहे.
१) आंघोळ करू नये
आंघोळ केल्याने शरीरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होत असते. त्यामुळे जेवण झाल्यावर आंघोळ करणे टाळावे.
२) चहा पिऊ नका
चहापत्तीमध्ये जास्त प्रमाणात आम्लाचं प्रमाण असते, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळावे.
३) स्मोकिंग करू नये
जेवल्यावर काहीजण स्मोकिंग करतात, परंतु हे शरीरासाठी घातक आहे. सिगारेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
४) झोपू नका
जेवण झाल्यानंतर अनेकांना झोपण्याची सवय असते, परंतु ते सर्वानी टाळावे. कारण अन्नाचं पचन व्हायला वेळ लागतो, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नये. झोपण्यापूर्वी थोडावेळ फिरून घ्यावे त्यानंतर झोपावे.
५) फळं खाऊ नये
जेवण केल्यानंतर फळे खाल्यावर फळांमधील पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्येच चिटकून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. जेवण झाल्यावर एका तासाने फळे खावावीत असा सल्ला डॉक्टर देतात.
COMMENTS