कडुनिंबाची चव जरी कडवट लागत असली तरी त्यामध्ये औषधीय गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी लाभदायक असतात.
मुंबई । नगर सह्याद्री
health tips : कडुनिंब हे अत्यंत गुणाकारणी आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. कडुनिंबाची चव जरी कडवट लागत असली तरी त्यामध्ये औषधीय गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी लाभदायक असतात. सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाचे सेवन केल्याने शरीरामधील अधिक आजार बरे होतात.
रिकाम्या पोटी कडुनिंब खाण्याचे फायदे :
रोगप्रतिकारशक्ती वाढते : कडुनिंबाच्या पानामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच अँटी ऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच सर्दी, खोकला यासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते.
ब्लडशुगर नियंत्रण : जंक फूड खाण्याने डायबिटीज रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कडुनिंबाच्या पानांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रक्त साफ होण्यास मदत : कडुनिंबामध्ये असे औषधीय गुणधर्म आहेत जे रक्त साफ करण्यास मदत करतात. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. रक्त साफ असेल तर तुम्हाला आजार होणार नाहीत.
पोटासाठी फायदेशीर : कडुनिंबामुळे त्वचाच नाही तर पोटही चांगले राहते. कडुलिंबामधील गुण अॅसिडिटीसाठी फायदेशीर ठरतात. रिकाम्या पोटी पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून प्यायल्याने अॅसिडिटी तसेच पोटदुखी बरी होण्यास मदत होते.
COMMENTS