अशा प्रकारे व्हिडीओ एडिट करणे चुकीचे असून आपल्या राज्याची ही संस्कृती नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई । नगर सह्याद्री
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. परंतु हा विडिओ एडिट केला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अशा प्रकारे व्हिडीओ एडिट करणे चुकीचे असून आपल्या राज्याची ही संस्कृती नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खुर्चीवर मुख्यमंत्री शिंदे बसताना काही वाक्य बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी शिंदे यांनी हे चुकीचे आहे असे म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलू या, अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद 'सोशल मीडिया'वरून चुकीच्या एडिट करून व्हायरल करणे हे खोडसाळपणाचे लक्षण आहे. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
व्हिडीओमधील संवाद?
- मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत खुर्चीवर बसत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उद्देशून म्हणत आहेत की 'आपण बोलून मोकळं व्हायचं' आणि निघून जायचं.
- अजित पवार त्यावर म्हणतात हो, येस.
- मुख्यमंत्र्यांना सावध करत फडणवीस म्हणतात माईक चालू आहे, तर अजित पवार म्हणतात ऐकू जातंय
COMMENTS