नवी दिल्ली / नगर सह्याद्री राष्ट्रवादीमध्ये शरद पवार व अजित दादा गटांमध्ये देखील शिवसेनेसारखी रस्सीखेच सुरु झाली आहे. दरम्यान आता अजित पव...
नवी दिल्ली / नगर सह्याद्री
राष्ट्रवादीमध्ये शरद पवार व अजित दादा गटांमध्ये देखील शिवसेनेसारखी रस्सीखेच सुरु झाली आहे. दरम्यान आता अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे जे दावे केले होते त्याविरोधात सडेतोड उत्तर दाखल करण्यात आले आहे.
त्यामुळे शिवसेना पक्ष फुटीनंतर दोन्ही गटांमध्ये जसा पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद होता अगदी तसाच वाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे G-20 परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचं कार्यालय आज बंद आहे. पण तरीही एका मेलद्वारे शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल केलं आहे.
यापूर्वी अजित पवार गटाकडून जे दावे करण्यात आले होते की, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. याबाबतची निवड झाली असून याबाबतचे कागदपत्रे निवडणूक आयोगात सादर करण्यात आले होते.
ते सर्व आरोप शरद पवार यांच्या गटाकडून पाठवण्यात आलेल्या उत्तरात फेटाळण्यात आले आहेत. शरद पवार गटाने उत्तरात काय म्हटलंय? या उत्तरात शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या 40 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. 9 मंत्र्यांसह 31 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. तसेच अजित पवार गटाचे सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहेत.
COMMENTS