अहमदनगर / नगर सह्याद्री नगर मनमाड महामार्गावर रस्तालूट करणारे चार जण एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. नागेश संजय चव्हाण (वय २३ रा मो...
अहमदनगर / नगर सह्याद्री
नगर मनमाड महामार्गावर रस्तालूट करणारे चार जण एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. नागेश संजय चव्हाण (वय २३ रा मोबीन आखाडा राहुरी), अक्षय उत्तम माळी )वय १९ रा. झोपडपटटी राहुरी), संकेत उर्फ सनी सोपान बर्डे (वय २२ रा. झोपडपटटी राहुरी), किरण उर्फ हुंगा राजेंद्र जगधने (वय ३० वर्ष रा. झोपडपटटी राहुरी) असे आरोपींचे नावे आहेत.
समजलेली अधिक माहिती अशी : दिनांक ९ जुलै २०२३ रोजी अनिल मोहन म्हस्के हे रात्री देहरे शिवारात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. तलवारीचा धाक दाखवून व मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल व १० हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल असा १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुददेमाल चोरून नेला.
त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा वरील उल्लेख केलेल्या सराईत आरोपींनी केला आहे. ते सर्व राहुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक तयार केले.
त्यांना राहुरी येथे पाठवून सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल व १० हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस ठाणे, पोसई चांगदेव हंडाळ, पोना चव्हाण, पोकों किशोर जाधव, पोकों. गजानन गायकवाड, पोकों नवनाथ दहिफळे, मोबाईल सेल अहमदनगरचे मपोना / १६५६ रिंकु मढेकर, पोकों / २४३५ नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS