मुंबई / नगर सह्याद्री मराठा आरक्षणावर आज सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीपुर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. विधान ...
मुंबई / नगर सह्याद्री
मराठा आरक्षणावर आज सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीपुर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत हा मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. अनेक छोट्या मोठ्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. शिवसेना पक्षाला अधिकृतपणे बोलावलं नाही.
याबाबत विभागच्या सचिवांकडे आक्षेप नोंदवला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 60 संघटनांना चर्चेसाठी बोलावलं होतं. पण या सरकारने मनाचा कोतेपणा दाखवून दिल्याचं आमचं मत आहे.
मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायला वेळ आहे. दुसरे उपमुख्यमंत्री कोल्हापूर तर एक दहीहंडी फोडतात. मात्र उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांकडे जाण्यास त्यांना वेळ नाही. या बैठकांच आयोजन करताना ते राजकारण करतात. अनेक गावांत अनेक तरुण उपोषणाला बसले आहेत. 300 लोक जखमी केले आहेत. ढुंकूनही पाहायला वेळ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
COMMENTS