अहमदनगर / नगर सह्याद्री हॉटेलवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अहमदनगर मधील हॉटेलवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आह...
अहमदनगर / नगर सह्याद्री हॉटेलवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अहमदनगर मधील हॉटेलवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
बाभळेश्वर येथील हॉटेल साईप्रसादवर सदर कारवाई झाली आहे. यात पोलिसांनी परप्रांतीय पीडित महिलेची सुटका केली आहे. बाभळेश्वर-राहाता या महामार्गालगत असलेल्या हॉटेल साईप्रसाद येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार छापा टाकण्याची योजना आखण्यात आली. यासाठी आधी एक बनावट ग्राहक पाठवला.
तेथे हॉटेल चालकाने रूम आणि इतर साहित्याची व्यवस्था केली. पोलिसांनी अचानक छापा टाकून पीडित महिलेची सुटका तर केलीच पण कुंटणखाना चालवण्याचे साहित्य आणि आरोपीला ताब्यात घेतले. हॉटेल चालक दीपक बाबासाहेब थोरात, रा. कोल्हार बुद्रुक यास ताब्यात घेतले.
त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 554/23 अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलम 3, 4, 5, 7, 8 नुसार संगीता भानुदास नागरे, लोणी पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सपोनि युवराज आठरे यांनी घटनास्थळी पोहचून कायदेशीर बाबींसाठी पोलिसांना सूचना दिल्या.
COMMENTS