नगर सह्याद्री टीम जी-२० परिषदेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. या परिषदेस तीन दिवसांसाठी दिल्लीत ९ देशांचे प्रमुख नेते आणि १०० हून अधिक पाहुणे य...
नगर सह्याद्री टीम
जी-२० परिषदेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. या परिषदेस तीन दिवसांसाठी दिल्लीत ९ देशांचे प्रमुख नेते आणि १०० हून अधिक पाहुणे येणार आहेत. त्यामुळे सिक्युरिटी यंत्रणा अत्यंत जबरदस्त ठेवण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ला झालाच तर सुरक्षा रक्षकांना शस्त्रास्त्रांची कमतरता भासू नये यासाठी हे व्हीआयपी ज्या हॉटेलांमध्ये उतरणार आहेत तिथे फुल लोडेड शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर एखाद्या ह़ॉलिवूडच्या फिल्ममध्ये वापरतात ती स्मोक ग्रेनेड, औषधे आणि इतर बॅकअप शस्त्रास्त्रे तयार ठेवण्यात आली आहेत.
वायरलेस सेट बंद होऊ नये म्हणून त्याचे चार्जर, बॅटरी आदी गोष्टी देखील ठेवली आहेत. अमेरिकेसारख्या देशांच्या सुरक्षा व्यवस्थेशीही सल्लामसलत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत प्रगती मैदान ते पंतप्रधान निवासाच्या परिसराला नो फ्लाईंग झोनमध्ये टाकण्यात आले आहे.
कोणतीही वस्तू एनडीएमसी परिसरात उडाली तर ती पाडली जाणार आहेत. यासाठी अँटी ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे. हॉटेलांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे.
व्हीव्हीआयपी पाहुण्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेकदा व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे. हा स्टाफ एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर देखील जाऊ शकणार नाहीय, अशी कार्ड यंत्रणा बसविण्यात आली आहे.
COMMENTS