मुंबई / नगर सहयाद्री शरद पवार यांच्या घरी उद्या इंडीया आघाडीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीत जागावाटपा बाबत निर्णय होण्याची शक्...
मुंबई / नगर सहयाद्री
शरद पवार यांच्या घरी उद्या इंडीया आघाडीची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीत जागावाटपा बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणूकीची रणनितीही ठरवली जाणार आहे. मागील सप्ताहात मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला आम्ही जाणार आहोत. या बैठका आता यापुढे सुरु राहतील त्याप्रमाणे आम्ही काम करु, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान इंडिया आघाडीच्या आजवर तीन बैठका पार पडल्या आहेत. पाटणा, बंगळुरु आणि मुंबईत अशा अनुक्रमे या बैठका झाल्या.
यामध्ये जागावाटप हा तिढा राहिलेला आहे. यावर तोडगा काढण्याची जबाबदारी शरद पवार यांवर आहे. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे इंडिया या शब्दावरून देखील राजकारण सुरु झालेलं आहे त्यावर देखील मंथन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS