जालना /नगर सह्याद्री सरकारला आपण ४० वर्ष वेळ दिलाय, आता सरकार १ महिन्याचा वेळ मागतंय, हा १ महिना कशासाठी हवाय याचे उत्तर सरकारने द्यावे. म...
जालना /नगर सह्याद्री
सरकारला आपण ४० वर्ष वेळ दिलाय, आता सरकार १ महिन्याचा वेळ मागतंय, हा १ महिना कशासाठी हवाय याचे उत्तर सरकारने द्यावे. मराठ्यांना टिकणारे आरक्षण देऊ असं सरकार म्हणतंय.
आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. परंतु तुम्ही ही प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवणार हे सांगावे. सरकारनं एका महिन्यात निर्णय घेतला नाही तर ३१ व्या दिवशी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणावरील तज्ज्ञांचे, कायदे अभ्यासक सर्वांचे म्हणणं आहे की, आरक्षणाची लढाई लहान नाही. ही खूप मोठी आहे. कायद्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो.
सरकार म्हणतं आम्ही १ दिवसात जीआर काढतो पण त्याला कुणी चॅलेंज केले तर ते टिकणार नाही. आता वेळ द्यायचा की जीआर काढायचा यावर जनतेने ठरवावे. माझी मनस्थिती द्विधा झाली आहे. तुम्ही मला उत्तर द्यावे असे ते म्हणले आहेत.
आमरण उपोषण मागे घेऊन आजपासून आंदोलनस्थळी साखळी उपोषण सुरू ठेऊ. जरी १ महिन्याचा वेळ दिला तरी मी आंदोलनस्थळ सोडणार नाही.
मराठ्यांना जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्याला पर्याय नाही, अन्यथा आपल्या डोक्यावर खापर फोडले जाईल असं जरांगे यांनी स्पष्ट केले.
जरांगेंच्या सरकारला पाच अटी
अहवाल कसा आला तरी महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावी लागणार, महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यायचे, जेवढे अधिकारी दोषी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं, उपोषण सोडायला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ उपस्थित असलं पाहिजे.
उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती देखील आले पाहिजेत. उदयनराजे भोसले यांना मध्यस्थी ठेवणार आहेत. दोघांच्या मध्ये सरकार आणि मराठा समाज्या मध्ये दोन्ही राजे असावेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. उदयनराजे आपल्या बाजूनं आहेत. सरकार यांच्यावतीनं आम्हाला हे सगळं लिहून टाइम बाऊंड घेऊन लिहून द्या, आणि तुम्हाला दिलेल्या एक महिना हे मान्य असल्यास सरकार कधी उपोषण सोडायला बोलवायचं हे सांगा, असं मनोज जरांगे म्हणाले.
COMMENTS