पारनेर | नगर सह्याद्री महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कर्मचार्यांच्या विविध मागण्यासाठी २ ऑटोबर रोजी मंत्रालय मुंबई येथे पायी लाँग ...
पारनेर | नगर सह्याद्री
महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कर्मचार्यांच्या विविध मागण्यासाठी २ ऑटोबर रोजी मंत्रालय मुंबई येथे पायी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ड वर्ग महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. ज्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. मात्र नगर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेले नाही. या महागाईच्या काळामध्ये कर्मचार्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता ही स्थिती पाहता सातव्या वेतन आयोगासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.
महापालिका कर्मचार्यांच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्या आशयाचे निवेदन आमदार संग्राम जगताप यानदेण्यात आले. व यासाठी त्यांनी महापालिका अंतर्गत कर्मचार्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लावावी अशी मागणी अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. यावेळी आ. जगताप बोलत होते.
अहमदनगर मनपा कामगार युनियनचे वतीने आमदार संग्राम जगताप यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले, यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर, बाबासाहेब मुद्गल, सतीश ताठे, परिमल निकम, विकास गीते, बलराज गायकवाड, गुलाब गाडे आदी उपस्थित होते.
COMMENTS