नगर सह्याद्री टीम निसर्गामध्ये काहीही घडू शकते. निसर्गाचे अजब कोडे उलगडणे कठीण आहे. दरम्यान आता निम्मा कुत्रा आणि निम्मा कोल्हा असलेला जगा...
निसर्गामध्ये काहीही घडू शकते. निसर्गाचे अजब कोडे उलगडणे कठीण आहे. दरम्यान आता निम्मा कुत्रा आणि निम्मा कोल्हा असलेला जगातील पहिला प्राणी सापडला आहे. त्याला डॉग्जिम असं नाव देण्यात आलं आहे.
ब्राझीलमध्ये हा प्राणी सापडला आहे. हा अरणी एका कारसमोर आल्यानं प्राणी जखमी झाला. त्यामुळे असा प्राणी जगात अस्तित्वात असल्याचं पहिल्यांदाच समोर आलं.
डॉग्जिमचा जेनेटिक तपशील मिळवण्याचं काम सुरू आहे. या प्राण्याचा जन्म पॅम्पास कोल्हीणीच्या पोटातून झाला. तर डॉग्जिमचा पिता पाळीव कुत्रा आहे. डॉग्जिमच्या शरीरात कुत्रा आणि कोल्हीणीचे जिन्स आहेत. त्यामुळे त्याच्या शरीराचा आकार, रंग आणि अन्य अनेक गोष्टी कुत्रा आणि कोल्हीणीसारख्या आहेत.
त्याचं वर्तनदेखील दोन्ही प्राण्यांसारखं आहे. डॉग्जिमचे कान टोकदार आहेत. ते आकारानं मोठे आहेत. क्रॉसबीड असूनही हा प्राणी माणसांना घाबरत नाही. डॉग्जिम माणसांशी जिव्हाळ्यानं वागते. माणसांच्या कुशीत आनंदानं बसते. थोपटल्यावर खेळू लागते.
शास्त्रज्ञांना तिला खाऊ घातलं. पण तिनं ते खाल्लं नाही. पण जिवंत उंदिर मात्र आवडीनं खाल्ले. डॉग्जिम कुत्र्यासारखी भुंकते. चालचलन पूर्णत: कोल्हासारखी आहे. डॉ. फ्लाविया फरारी यांनी तिच्यावर उपचार केले.
COMMENTS