अहमदनगर / नगर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यातून जम्मू काश्मिर (शिवखोडी) तिर्थ यात्रेसाठी काही महिला गेल्या होत्या. येथील एका शिवमंदिरात दर्शन घ...
अहमदनगर / नगर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यातून जम्मू काश्मिर (शिवखोडी) तिर्थ यात्रेसाठी काही महिला गेल्या होत्या. येथील एका शिवमंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा एकदा दर्शनासाठी जात असताना चक्कर आली आणि तेथेच तिने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
सुनिता किशोर लांडे (वय 40) असे सदर महिलेचे नाव आहे. तिचे माहेर राहाता तालुक्यातील रांजणखोल असून ती राहुरी येथील रहिवासी आहे. शिवखोडी देवस्थान भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील रियासी शहराजवळील पौनी, संगार गावात वसलेले भगवान शिव असलेले प्रसिद्ध गुहा आहे.
त्यामुळे याठिकाणी तिर्थ यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात. राहुरी येथून शुभकीर्ती ग्रुपच्या वतीने राहुरी ते वैष्णोदेवी दर्शन यात्रा काढली होती. यात्रा कटरा येथे पोहोचल्यावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी पायी माता वैष्णोदेवी दर्शन घेतले. खाली उतरल्यानंतर दुसर्या दिवशी शनिवारी शिवखोडी येथे दर्शनास गेले होते.
यामध्ये राहुरी येथील सुनिता किशोर लांडे (वय 40) यांनी आपल्या बरोबरच्या भाविकांसमवेत रविवारी शिवदर्शन घेतले. सर्व भाविक बाहेर आल्यानंतर पुन्हा सुनीता लांडे यांच्या मनात काय आले नी त्या पुन्हा शिवदर्शनासाठी जाऊ लागल्या. त्यांना काहींनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यांनी दाद दिली नाही.
दर्शन रांगेतील एक ग्रील त्यांनी बळजबरीने पार केला. दुसरा ग्रील पार करत असतानाच त्या अचानक खाली कोसळल्या आणि बेशुध्द झाल्या. त्याचवेळी तेथे असलेले भाविकांनी त्यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांनी तेथेच आपले प्राण सोडले होते.
COMMENTS