मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाचा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला त्यावरून सध्या महाराष्ट्रभर संताप व्यक केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी आ...
मुंबई / नगर सह्याद्री
मराठा समाजाचा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला त्यावरून सध्या महाराष्ट्रभर संताप व्यक केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. दरम्यान आता या सर्व गोष्टींवरून भाजपाच्या आशिष देशमुखांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला सोबत घेऊन अजित पवारांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव असल्याचा आरोप देशमुखांनी केल्याने चर्चाना उधाण आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याच्याशी सरकार सहमत आहे.
भाजपाची मराठा समाजास OBC मधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भुमिका आहे. परंतु दुसरीकडे मराठा समाजाला घेऊन अजित पवार यांना अडचणीत अडकवायचे व त्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात परत आणायचे हा डाव शरद पवार यांचा आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने ही केस व्यवस्थित हाताळली नाही म्हणून सुप्रीम कोर्टात ती टिकू शकले नाही, अशी टीका देशमुख यांनी केली.
COMMENTS