अहमदनगर / नगर सह्याद्री आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना तपासून ...
आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना तपासून हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पो नि दिनेश आहेर हे कार्यवाही करत होते.
पोलिसांचे पथक अहमदनगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांना तपासात असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हद्दपार इसम स्वप्निल वाघचौरे रा. भिंगार, अहमदनगर हा त्याचे राहते घरी येणार असुन त्याचे ताब्यात चोरीची विना नंबरची एव्हिएटर मोपेड मोटार सायकल आहे.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार एक पथक तेथे गेले असता स्वप्निल वाघचौरे या ताब्यात घेतले. तेथे असणाऱ्या विनाक्रमांक एव्हिएटर मोटार सायकल बाबत विचारणा केली असता धक्कादायक खुलासा समोर आला. अशोक नामदेव जाधव रा. शाहुनगर, केडगांव याने 70 हजार रुपये देऊन खंडाळा येथील संदीप मच्छिंद्र वाघ यास मारण्याची सुपारी दिली होती. प्रताप सुनिल भिंगारदिवे , विशाल ऊर्फ झंडी लक्ष्मण शिंदे,
रविंद्र विलास पाटोळे आदींनी केडगाव येथे संदीप मच्छिंद्र वाघ याचे डोक्यात व पायावर जबर मारहाण केली व त्याचे जवळील एव्हिएटर मोटार सायकल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. सुपारी देणारा आरोपी अशोक नामदेव जाधव याकडे संदीप वाघ यास मारण्याचे कारणाबाबत चौकशी केली असता त्याने अनैतिक संबंधाच्या कारणावरुन सदर बनाव रचल्याचे सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
COMMENTS