मुंबई / नगर सह्याद्री : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी आहे. कडवे शिवसैनिक असणारे ठाकरे गटाचे रत्...
मुंबई / नगर सह्याद्री : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी आहे. कडवे शिवसैनिक असणारे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचा मृतदेह वाढल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर आढळून आला. मृतदेह अत्यंत छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आलाय. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
परंतु शिवसैनिकांच्या खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ते ज्यावेळी घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत अंगरक्षकांना घेतले नाही. बैठकीला जायचंय असे सांगून ते बाहेर पडले. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला.
कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आणि मोठा जनसंपर्क या सुधीर मोरे यांच्या नेतृत्त्वाच्या जमेच्या बाजू होत्या. ते कडवे शिवसैनिक म्हणून परिचित होते. सध्या ते रत्नागिरीचे संपर्कप्रमुख होते.
COMMENTS