अहमदनगर / नगर सह्याद्री राहत्या घरातून नोकरांनीच सोन्याचे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना शहरातील बांगडीमळा येथे घडली आहे. मिहिर मिलिंद ...
अहमदनगर / नगर सह्याद्री
राहत्या घरातून नोकरांनीच सोन्याचे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना शहरातील बांगडीमळा येथे घडली आहे. मिहिर मिलिंद कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार रोशन दर्जी व रोशनी दर्जी यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
40 हजार रुपयांची गळ्यातील चैन, 25 हजार रुपयांची अंगठी नोकरांनी लांबवली असल्याचे म्हटले आहे.
अधिक माहिती अशी : मिहिर कुलकर्णी हे बांगडी मळा, बालीकाश्रम रोड, अहमदनगर येथे राहतात. ते एमआयडीसी येथे खाजगी व्यवसाय करतात. 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ते एमआयडीसी येथे कामावर गेले असताना त्यांच्या आईने त्यांना घरातील दोन तोळयाची सोन्याची चैन व सव्वा तोळे वजनाची सोन्याची अंगठी गायब असल्याचे सांगितले.
घरातील नोकर व त्याची पत्नी घरात दिसत नसल्याचेही सांगितले. त्यावेळी घरातील लोकांनी नोकरांचा शोध घेतला. ते रेल्वे स्थानकावर आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला आमच्या घरी पश्चिम बंगाल येथे जायचे असल्याने व आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही तुमची सोन्याची चैन व अंगठी घेतली असे कबूल केले.
परंतु आम्ही रेल्वे स्टेशन येथे येत असताना ते दागिने गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मिहीर यांनी त्या दोघांना तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. व या दोघांविरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
COMMENTS