जळगाव / नगर सह्याद्री मराठा आंदोलकांवरील जे हल्ले झाले त्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत...
जळगाव / नगर सह्याद्री
मराठा आंदोलकांवरील जे हल्ले झाले त्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत देखील निदर्शने झाली. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच, बारामतीमधील या मोर्चात अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. याच अनुशंघाने आमदार रोहित पवार यांना जळगावमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, रोहित पवार यांनी या प्रश्नावर उत्तर देणं गोलगोल टाळलं.
अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का? मराठा नेते आणि बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं?. मात्र, या प्रश्नावर त्यांनी शाब्दिकरित्या गोलगोल फिरवत उत्तर देणं टाळल. तिथल्या घोषणा व्यक्तीगत होत्या, तिथले लोकप्रतिनीधी अजित दादा आहेत.
ही त्यांच्या मतदारसंघातील भूमिका आहे, त्यामुळे यावर मी काही बोलू शकणार नाही. जे काही बोलायचंय ते दादा बोलतील, असे म्हणत रोहित पवार यांनी उत्तर देणं टाळलं.
COMMENTS