सोलापूर / नगर सह्याद्री राज्यात सध्या भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांचे सरकार आहे. परंतु एका घटनेने वातवरण तापले आहे. भाजपचे आमदार गोपीच...
सोलापूर / नगर सह्याद्री
राज्यात सध्या भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांचे सरकार आहे. परंतु एका घटनेने वातवरण तापले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर तोंडसुख घेतले.
अजित दादांना तर लांडग्याच पिल्लू आहे अशा भाषेत टीका केली. परंतु आता यानंतर अजित पवार गट संतप्त झाला आहे. महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. सोलापूर शहरातील भैय्या चौक या ठिकाणी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचं निषेध केला.
डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे सुहास कदम यांनी पडळकराना इशारा दिला आहे.अजित पवार हे सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत,आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे बेताल वक्तव्य करत आहेत.
सुसंस्कृत पक्षातील नेत्याने किंवा आमदाराने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तसेच आमदार मिटकरी यांनी पडळकरांना आवरा अन्यथा सत्तेत आहोत हे विसरून जाऊ असा इशारा दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर असेच बेताल वक्तव्य करत राहिले तर राष्ट्रवादी त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा सुहास कदम यांनी दिला आहे.
COMMENTS