श्रीगोंदा / नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (दत्तवाडी) येते ९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात...
श्रीगोंदा / नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (दत्तवाडी) येते ९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यमुनाबाई नानासाहेब शिंदे असे सदर जखमी महिलेचे नाव आहे.
सलग आठ दिवसात दुसरी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांच्या भितीचे वातावरण आहे. सविस्तर माहिती अशी कि तालुक्यातील भिमानदीकाठी असलेल्या अजनुज येथील दत्तवाडी येथील यमुनाबाई शिंदे या रात्री जेवन झाल्यनंतर घराच्या बाहेर पडवीत झोपल्या होत्या.
दबा धरून बसलेल्या बिबट्याने रात्री त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी कुत्र्यांनी मोठ्याने भुंकायला सुरवात केली. आवाज ऐकून महिलेची मुले महादेव व हौसेराव शिंदे बाहेर आले. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य भानुदास कवडे यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी गाडी घेऊन आले.
त्यांच्या गाडी मध्ये वृध्द आजींना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु जखम मोठी असल्यामुळे तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आठवडाभरात ही दुसरी घटना घडली आहे. भागचंद शांताराम जाधव (वय वर्षे ३६) हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. वनविभागाने यांची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
COMMENTS