पुणे । नगर सहयाद्री पुण्यातील यंदाच्या उत्सवाला गालबोट लागलं. पुण्याच्या आप्पा बळवंत चौकात दहींहडी फुटल्यानंतर दोन गटात तुफान हाणामारी सुरु...
पुणे । नगर सहयाद्री
पुण्यातील यंदाच्या उत्सवाला गालबोट लागलं. पुण्याच्या आप्पा बळवंत चौकात दहींहडी फुटल्यानंतर दोन गटात तुफान हाणामारी सुरु झाली. यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवलं. हा वाद ढोल ताशा पथकाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पुण्यात मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. डीजेच्या तालावर नागरिक ठेका धरतात. मात्र, पुण्यातल्या प्रसिद्ध असलेल्या आप्पा बळवंत चौकात धक्काबुक्की झाल्यानं दोन गटात तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली.
ढोल ताशा पथकांच्या वादकांमध्ये आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा थरार रंगला होता. पहिल्यांदा ढोल ताशा पथकाच्या वादकांनी मंडळाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारलं. त्याच दरम्यान त्या कार्यकर्त्यांनी मंडळातल्या काही सदस्यांना त्या ठिकाणी बोलवत वादकांवर पलटवार केला.
तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं दोन गटांमध्ये झटापट आणि हाणामारी सुरू होती. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा आल्यानंतर पोलिसांनी गोंधळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणलं आणि जमलेली बघायची गर्दी पांगवली.
COMMENTS