अहमदनगर / नगर सह्याद्री जालन्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्यभर मराठा समाज आक्र...
अहमदनगर / नगर सह्याद्री
जालन्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मराठा समाजातील तरुणांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना घेराव घटल्याचीही घटना घडलीये. एकीकडे आंदोलने सुरु असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जालन्याच्या घटनेचे मी समर्थन करत नाही. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.
दोषींवर निश्चित कारवाई होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमच्या सरकारची भावना आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मागील सरकारमुळे गेलेलं आरक्षण पुन्हा प्रस्थापित व्हावं असं सांगतानाच, आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय, असंही ते म्हणाले. दरम्यान सध्या महाराष्ट्रभर आंदोलन झाली आहेत. अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज जालन्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली.
COMMENTS