रत्नागिरी / नगर सह्याद्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये सातत्याने जुगलबंदी सुरु असल्याचे पाहायला...
रत्नागिरी / नगर सह्याद्री
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये सातत्याने जुगलबंदी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले अन ही जुगलबंदी वाढतच चालल्याचे दिसते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर येथे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत बोलताना एका शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन कर्मचारी काम करतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे आहे.
या अर्थसंकल्पापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो, अशा स्वरूपाचे विधान केले होते. या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतीवर केला आहे. ते म्हणाले की अजित पवार यांची भूमिका बदललेली दिसते,
असाच फॉर्म्युला एका आमदाराच्या आणि खासदाराच्या पगारावर लावला तर करोडो रुपयांच्या खर्चात हजारो शासकीय कर्मचारी काम करतील, असा टोला लगावला आहे. दरम्यान या वादात आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे.
ज्यांचं राजकारणच अजित पवारांपासून सुरू झालं, त्यांनी दादांवर बोलू नये, अशा शब्दात त्यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले आहेत.
COMMENTS