नगर सह्याद्री टीम : नॉन-स्टिक भांडी ही आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. याचे कारण असं की, स्वयंपाक करताना नॉन-स्टिक भांडी...
नगर सह्याद्री टीम : नॉन-स्टिक भांडी ही आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. याचे कारण असं की, स्वयंपाक करताना नॉन-स्टिक भांडी वापरले तर तेल कमी लागते.
त्यामुळे याचा सर्रास वापर वाढला आहे. परंतु एका संशोधनानुसार या भांड्यांचा वापर केल्याने तुमच्या आरोग्यास नुकसानही होऊ शकते. चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर -
फ्लेक्स कोटिंगने होते समस्या
नॉन-स्टिक भांड्याच्या पृष्ठभागावर फ्लेक्स कोटिंग असते, जे कालांतराने कमी कमी होत जाते. त्यामुळे अन्न खाली चिकटून खराब रंग आणि वास येऊ शकतो. फ्लेक्स कोटिंग निघून गेल्यानंतर जे अन्न त्यावर तयार होते ते हानिकारक असू शकते.
अनेक रोगांचा धोका
नॉन-स्टिक भांड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अॅल्युमिनियम व्यतिरिक्त इतर मिश्रणांनी बनलेले असतात, ज्यामध्ये फ्लोरोकार्बन पदार्थ (पीएफएएस) देखील समाविष्ट असतात. PFAS वापरल्याने विषाणूचा संसर्ग वाढू शकतो, ज्यामुळे कर्करोग, हार्मोनल रोग आणि इतर आरोग्य समस्या होऊ शकतात. विशेषत: जेव्हा तुम्ही उच्च तापमानात अशा भांड्यांमध्ये अन्न शिजवता तेव्हा नुकसान अनेक पटींनी वाढू शकते.
टेस्ट खराब होऊ शकते
नॉन-स्टिक भांडी जुनी झाली की त्याचे कोटिंग खराब होते, त्यामुळे स्वयंपाक करताना ते अन्न पदार्थाना चिकटू लागते. त्यामुळे जेवणाची चव बिघडू शकते. तसेच विविध आजारांना देखील आमंत्रण भेटते.
COMMENTS