अहमदनगर / नगर सह्याद्री उद्धव ठाकरे यांचे सध्या दुष्काळी दौरे सुरु आहेत. या दौऱ्यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर ...
अहमदनगर / नगर सह्याद्री
उद्धव ठाकरे यांचे सध्या दुष्काळी दौरे सुरु आहेत. या दौऱ्यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. ते म्हणाले की, अडीच वर्षे घरात बसून, मंत्रालयाची दारे बंद ठेवणा-यांचे दुष्काळी दौरे म्हणजे एक राजकीय स्टंट आहे.
ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना एक रुपयाचीही मदत करु न शकलेल्या उध्दव ठाकरेंना महायुतीच्या पिक विमा योजनेवर टिका करण्याचा आधिकारच नाही. अशी खरमरीत टीका विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सत्तेच्या काळात मराठवाड्यात आणि कोकणात जावून शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू अंमलबजावणी झाली नाही. फक्त फेसबुकवर बोलत राहीले.
सत्ता गेली स्वत:च्या पक्षाचे अस्तित्वही संपले तेव्हा यांना आता शेतक-यांची आठवण झाली आहे. त्यांच्या दौ-याने काय साध्य झाले, कोणती मदत शेतक-यांना मिळाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शासन आपल्या दारी उपक्रमावर केलेल्या टिकेचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, तुम्ही तर अडीच वर्षे मंत्रालयाची दारेच बंद करुन बसला होता. आम्ही तर राज्यातील जनतेसाठी मंत्रालयाची दारे खुली केली आहेत. आत्तापर्यंत शेतक-यांना १२ हजार कोटी रुपयांची मदत केली.
तुमच्या सरकारच्या काळात पिक विमा कंपन्यांकडून शेतक-यांची फसवणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
COMMENTS