असं करणारी करिना एकटीच नव्हती परंतु तरीदेखील नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान ओटीटी पदार्पणामुले नेहमीच चर्चेत आहे. करीना तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलमुळेओळखली जाते. परंतु बऱ्याचदा ती असं काही करते की तिच्या वागण्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करतात. करीना अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाली असताना तिथे तिने रेड कलर फ्री साइज लूज कुर्ता आणि लुंगी स्टाइल स्कर्ट कॅरी केला होता.
या प्लेन रेड कुर्त्यावर हेवी एम्ब्रॉयडरी नेक स्टाइलने ती खुपच सुंदर दिसत होती. मात्र यावेळी तिने एक चूक केल्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती राष्ट्रगीत गाताना दिसली आहे. परंतु तिचे हावभाव आणि हालचालीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.राष्ट्रगीत म्हणताना करीना कपूर महिलांसोबत उभी होती, त्यानंतर तिने आपले दोन्ही हात पकडले, त्यामुळे नेटकऱ्यानी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
असं करणारी करिना एकटीच नव्हती परंतु तरीदेखील नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की तिला कुणीतरी सांगा की लोक राष्ट्रगीत गातांना सावधान स्थितीमध्ये उभे राहावे. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास करीना कपूर लवकरच 'जाने जान' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
COMMENTS