अहमदनगर / नगर सह्याद्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्...
अहमदनगर / नगर सह्याद्री
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आमदार जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, युवकांची मोठी फौज राष्ट्रवादीत कार्यरत आहे. विकासात्मक अजेंडा ठेवून शहरात सुरु असलेल्या कार्यामुळे युवा वर्ग पक्षाशी जोडला गेला आहे.
राष्ट्रवादीत युवकांना मान सन्मान देवून त्यांच्यात नेतृत्व निर्माण करुन काम करण्याची संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी युवकच्या नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी युवकची शहर जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे:-
उपाध्यक्ष- वैभव ससे, गौरव हरबा, केतन ढवन, मंगेश शिंदे, तानमितसिंह सरना,
सचिव- आशुतोष पानमळकर, समृध्द दळवी, विक्रम घटे, ओंकार म्हसे, तन्वीर शेख,
सहसचिव- दीपक गोरे, प्रशांत पालवे, साहिल पवार, शुभम जोशी,
सरचिटणीस- अभिजीत खरात, ऋषिकेश जगताप, कृष्णा शेळके, शिवम कराळे, श्रावण जाधव,
प्रसिध्दी प्रमुख- कुनाल ससाणे, ओंकार मिसाळ, ओंकार साळवे,
सोशल मीडिया प्रमुख- स्वप्निल कांबळे, शुभम चितळकर, राहुल वर्मा, मंगेश जोशी, हरीश पंडागळे, सुमित गोहेर,
युवक विधानसभा अध्यक्ष- सुमित कुलकर्णी, वक्ता प्रमुख- किरण घुले.
COMMENTS