कान्हूर पठार | नगर सह्याद्री राज्यात प्रसिद्ध असलेल्या पारनेर तालुयातील कान्हूरपठार येथील श्रावणी बैलपोळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला....
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
राज्यात प्रसिद्ध असलेल्या पारनेर तालुयातील कान्हूरपठार येथील श्रावणी बैलपोळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शेतात कष्ट करणार्या बैल जोडीला सजवून शेतकर्यांनी त्यांची मिरवणूक काढली. यंदा पोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतातील पिके पावसाअभावी माना टाकू लागल्या आहेत.
बैलांची संख्या घटली, नृत्यांंगनाची वाढली !
यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. असे चित्र एकीकडे असले तरी तरी नाचणार्या नृत्यंगांच्या संख्येत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
परंतु असे असतानाही शेतकर्यांनी शेतात वर्षभर राबणार्या बैल जोडीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला. गावात कुठलीही मोठी यात्रा भरत नसते. त्यामुळे गावचा पोळा हेच गावासाठी मोठी यात्रा असते. प्रथम मानाच्या बैल जोडीची मिरवणूक गावामधून निघाली व गावच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. शेतकर्यांनी फटायांची आतिषबाजी करत बैलांची मिरवणूक काढली होती.
डीजेच्या दणदणाटाने डेसिबलची मर्यादा ओलांडली
पोळ्यानिमित्त आणलेल्या चार डीजेच्या आवाजाने डेसिबलची मर्यादा ओलांडली. सुमारे १०९ डेसिबल पर्यंत आवाज गेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. बहुतेक नागरिकांनी कानामध्ये कापसाचे बोळे घातले होते.
COMMENTS