कान्हूरपठार | नगर सह्याद्री कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे गौराई यात्रे निमित्त किन्ही रोड येथे भरवण्यात आलेल्या आखाडयात आमदार नीलेश लंके प्र...
कान्हूरपठार | नगर सह्याद्री
कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे गौराई यात्रे निमित्त किन्ही रोड येथे भरवण्यात आलेल्या आखाडयात आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने १,११,००० रुपये व विजयानंद साळवे यासंकडून चांदीचा गदा बक्षीस ठेवण्यात आले होते. ही कुस्ती पै. योगेश पवार व पै. आकाश कावरे यांच्यात झाली. ही कुस्ती चितपट करून पै. योगेश पवार कान्हूर केसरीचा पाचवा मानकरी ठरला. या कुस्ती साठी पंच म्हणून आमदार नीलेश लंके यांनी काम पाहिले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, पै. गुंडा भोसले, अँँड राहूल झावरे, बाळासाहेब खिलारी, अमित जाधव, सुभाष नवले, सहादू नवले, दादाभाऊ सोनावळे, डी.सी व्यवहारे, भागा नवले, विजयानंद साळवे,गोपा ठुबे, बबन झावरे, चंद्रभान ठुबे, प्रसाद नवले, किरण ठुबे, संजू सोनावळे, नंदू सोनावळे, सचिन सोनावळे, सनी सोनावळे, सूरज नवले, प्रशांत नवले, श्रीकांत ठुबे, बंडू सोनावळे, अर्जुन चत्तर, स्वप्नील समोवंशी, अमित शेळके, प्रमोद खामकर, गोकुळ व्यवहारे, अरविंद लोंढे, तुषार सोनावळे, शुभम कोठारी, संतोष ठुबे, प्रा. तुषार ठुबे, प्रा.किरण लोंढे उपस्थित होते.
दुसरी कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पै.हनुमंत शिंदे व महाराष्ट्र चॅम्पियन पै.अनिल ब्राम्हणे यांच्यात झाली. ही कुस्ती पै.अनिल ब्राम्हणे यांनी चित्रपट केली. या कुस्ती साठी स्व. रावसाहेब आण्णा ठुबे यांच्या स्मरणार्थ किरण ठुबे यांंसकडून ७५,००० रुपये बक्षीस देण्यात आले.
तिसरी कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पै.विनायक वाल्हेकर व महाराष्ट्र चॅम्पियन पै.युवराज चव्हाण यांच्या झाली ही कुस्ती पै. युवराज चव्हाण याने चितपट केली. या कुस्ती साठी स्व. शंकरमामा ठुबे यांच्या स्मरणार्थ चंद्रभान ठुबे यांंसकडून ५१,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
चौथी कुस्ती पै. अमोल नर्हे व पै.दीपक पवार यांच्यात झाली ही कुस्ती दिपक पवार याने चितपट केली. या कुस्तीसाठी स्व.शिवाजी बाबुराव सोनावळे व स्व. पोपटलाल मुलचंद कोठारी यांच्या स्मरणार्थ संजू सोनावळे व शुभम कोठारी यांंसकडून ४१,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
पाचवी कुस्ती पै.संभाजी रोकडे व पै. देवराज खोसे यांच्या झाली. ही कुस्ती पै.संभाजी रोकडे यांनी चितपट केली. या कुस्ती साठी स्व.बाजीराव रमाजी ठुबे यांच्या स्मरणार्थ स्व.रमाजी उमाजी ठुबे परिवार यांच्याकडून ३१,००० रुपये बक्षीस देण्यात आले.
सहावी कुस्ती पै.आकाश चव्हाण व पै.लक्ष्मण धनगर यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. या कुस्ती साठी पै.भागाशेठ नवले यांंसकडून २१,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या सर्व विजेत्या पैलवानांना स्व.व्ही.बी. ठुबे यांच्या स्मरणार्थ पत्रकार श्रीकांत ठुबे यांस कडून मनाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. याप्रसंगी कान्हूरपठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक स्व. दिलीपराव ठुबे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष स्व. उदय शेळके यांच्या स्मरणार्थ २१,००० रुपयांची कुस्ती कान्हूरपठार पतसंस्थेचे संचालक सुभाष नवले, राजेंद्र व्यवहारे व महानगर बँकेचे व्यवस्थापक गोपाळराव ठुबे यांनी लावली.
COMMENTS