अहमदनगर। नगर सहयाद्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कार्यरत झाली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग...
अहमदनगर। नगर सहयाद्री
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कार्यरत झाली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
गणेशोत्सव तोंडावर आला आहे. कोरोनाच्या काळानंतर यंदा पहिल्यांदाच कुठल्याही निर्बंधांविना गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह असणार आहे.
मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे,स्ट्रिट लाईट सुरु करणे, बॅरेकेटींग करणे, या व इतर महत्वाच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. गणेशोत्व शांततेत पार पाडण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी केले. यावेळी मा.सहा.पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, शांतता समिती सदस्य संतोष बोबडे, रिजवान शेख, शामराव वाघस्कर,
दिपक लिपारे, कॅटोनमेंट अधिकारी दत्ता फुलारी, सतिष मगर, महावितरण कंपनीचे आबा परभणे,गोपनिय अंमलदार पोहेकॉ. गव्हाणे, पोहेकॉ.घोडके,पोना धोंडे आदी उपस्थित होते.
COMMENTS