मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन निघोज | नगर सह्याद्री क्रिडा क्षेत्रात मुलिंना चांगली संधी मिळत असून क्रिडा स्पर्धेत सहभागी ...
मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
निघोज | नगर सह्याद्री
क्रिडा क्षेत्रात मुलिंना चांगली संधी मिळत असून क्रिडा स्पर्धेत सहभागी होऊन मुलींनी तालुक्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन करताना त्यांनी बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाने क्रिडा विभागात चांगले काम केले असून शैक्षणिक सुधारणा होण्यासाठी या विद्यालयाचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी द्वारा आयोजित शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पारनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पठारवाडी येथे झाले. यावेळी बोलताना शेळके म्हणाल्या की , खेळाने सर्वांगीण विकास साधला जातो. मुलींनी खेळाकडे करिअर ची संधी म्हणून पहावे. संस्थेचे सर्व पदाधिकारी व सचिव वसंत कवाद यांनी संस्थेचे संस्थापक स्व. बाबासाहेब कवाद यांचे शैक्षणिक स्वप्न पुर्ण करण्यासाठी निघोज व परिसरात गुणवत्ता यादीत प्रथम श्रेणीत येतील असे विद्यार्थी घडविण्याचे काम केले असून शिक्षणाबरोबरच क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी चांगले प्रयत्न केले असल्याचे प्रतिपादन शेळके यांनी व्यक्त केले आहे. बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच संस्थेचे सचिव वसंत कवाद यांनी उपस्थित खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे स्वागत केले.पुढे बोलताना ते म्हणाले आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. मुलांनी खेळ खेळताना अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करावेत. कबड्डी साठी तेलगू टायटन्स संघात निवड झालेला उदयोन्मुख कबड्डीपटू प्रफुल्ल झावरे म्हणाला, शिक्षणाबरोबरच खेळात सहभागी व्हावे आपणास जीवनात निश्चित यश मिळते.
यावेळी बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शांताराम कळसकर, उपाध्यक्ष प्रकाश कवाद, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, संचालक दामुशेठ लंके, बाळासाहेब लामखडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, माजी चेअरमन रामदास वरखडे व सर्व संचालक मंडळ, पारनेर तालुका पत्रकार संघाचे सामाजिक उपक्रम विभागाचे प्रमुख विनोद गोळे, कार्याध्यक्ष दत्ता उनवणे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुनील वराळ, माजी सरपंच ठकाराम लंके, शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, गणेश कवाद, जी एस महानगर बँकेचे अधिकारी राहुल शेळके, निळकंठ सोनवणे, क्रीडा समिती प्रमुख बापूराव होळकर,उदयोन्मुख युवा कबड्डीपट्टू प्रफुल्ल झावरे, विद्यालयाचे प्राचार्य डायस सल्वादर, निघोज पतसंस्थेचे उपव्यवस्थापक शांताराम सुरकुंडे, वरिष्ठ अधिकारी सुनील तांबे, विठ्ठलराव कवाद, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, कार्यकारी सदस्य अमोल खिलारी, शिरीष शेलार उपस्थित होते. शिवराज कदम या विद्यार्थ्याने खेळाडूंकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली. सूत्रसंचालन बेलोटे सर यांनी केले तर आभार कोडदे मॅडम यांनी मांडले.
COMMENTS