निघोज | नगर सह्याद्री जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर तसेच मंळगंगा तिर्थक्षेत्र विकासासाठी आमदार नीलेश लंके यांनी पर्यटन व तिर्थक्षेत्र अंतर्गत व...
निघोज | नगर सह्याद्री
जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर तसेच मंळगंगा तिर्थक्षेत्र विकासासाठी आमदार नीलेश लंके यांनी पर्यटन व तिर्थक्षेत्र अंतर्गत विकास निधीतून पाच कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. लवकरच कामांचे भूमिपूजन होणार असून निघोज परिसरातून आमदार लंके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार लंके यांनी गेल्या चार वर्षात विकास कामांच्या माध्यमातून भरभरून दिल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यामध्ये निघोज ता. पारनेर येथे एन एच-६१ रोड ते कुंड रस्ता काँक्रीट करणे-६५ लक्ष रुपये, मळगंगा देवी परिसर सुशोभीकरण करणे-५५ लक्ष, मळगंगा देवी परिसर पर्यटन विसावा केंद्र बांधकाम करणे-२५० लक्ष, मळगंगा देवी परिसर पर्यटन भोजन कक्ष बांधकाम करणे-१३० लक्ष. अशाप्रकारे ५ कोटीची विकासकामे मंजूर झाली आहेत. मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, विविध संस्थांचे पदाधिकारी व संचालक तसेच ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर तसेच मंळगंगा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार लंके यांच्याकडे विकासकामांची मागणी केली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना ही कामे मंजूर झाली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर या विकासकामांना सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारानी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जात सत्तेत येण्यास पसंत केले. आमदार लंके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या बरोबर जाणे पसंत केले. त्यानंतर पुन्हा एकदा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात विकासकामांची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
मतदारसंघात दहा कोटीची विकासकामे येत्या आठ पंधरा दिवसांत मार्गी लागणार असून फक्त निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे पर्यटन व मंळगंगा माता तिर्थक्षेत्र यासाठी तब्बल पाच कोटीची कामे मार्गी लागणार असून आमदार नीलेश लंके यांनी विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने निघोज ग्रामस्थांना दिली होती त्यातील ९० टक्के आश्वासने विकासकामांच्या माध्यमातून पुर्ण झाली असून १० टक्के आश्वासने येत्या वर्षभरात मार्गी लागतील अशी अपेक्षा निघोज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात पर्यटकांची निवास व्यवस्था व भोजन कक्ष यासाठी ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे हजारो पर्यटकांची निवासाची व्यवस्था व भोजन प्रश्न मार्गी लागणार आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक वर्षभरात जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर पाहण्यासाठी येत असतात. राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मंळगंगा देवीचा मंदिर सुसज्ज आहे. साधारण एप्रिल ते मे महिन्यात होणार्या मंळगंगा देवीच्या यात्रेसाठी राज्यातून लाखो भाविक येत असतात. या भावीकांची व्यवस्था होण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत व मुंबईकर मंडळ तसेच मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट उत्कृष्ट नियोजन करीत असतात मात्र सुविधेत अपुर्णता राहू नये. तसेच देवीच्या यात्रा, नवरात्र, तिसरा श्रीवणी मंगळवार व ईतर उस्तवासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी मंळगंगा मंदीर परिसर सुशोभित करण्यासाठी आमदार लंके यांनी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
जगप्रसिद्ध रांजणखळगे व कुंड मंळगंगा माता तिर्थक्षेत्र परिसराला बाहेरील भाविक व पर्यटकांना गावाबाहेरुण जाता यावे यासाठी निघोज-जवळा बायपास ते खंडोबा पाउतके या काँक्रींटीकरण रस्त्यासाठी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून. आमदार लंके यांनी ही चारही कामे मंजूर करुण आणली असून या पाच कोटींच्या निधीच्या माध्यमातून जगप्रसिद्ध रांजणखळगे, मंळगंगा माता तिर्थक्षेत्र व बायपास रस्ता ही विकासकामे मोठ्या प्रमाणात पुर्णत्वास येणार असून कार्यक्षमपणे विकास कामे करणारे आमदार निलेश लंके हे राज्यातील अग्रगण्य लोकप्रतिनिधी असल्याची कौतुकस्पद प्रतिक्रिया निघोज ग्रामस्थ व्यक्त करीत असून आमदार लंके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून लवकरच त्यांचा भव्य सत्कार व सन्मान करण्याचा निघोज व परिसरातील ग्रामस्थांचा मानस आहे.
COMMENTS