निघोेज | नगर सह्याद्री मळगंगा देवीच्या जयघोषाने मंगळवार दि. ५ रोजी निघोज नगरी दुमदुमून गेली होती. श्रावण महिण्याच्या तिसर्या मंगळवारी पिंपर...
निघोेज | नगर सह्याद्री
मळगंगा देवीच्या जयघोषाने मंगळवार दि. ५ रोजी निघोज नगरी दुमदुमून गेली होती. श्रावण महिण्याच्या तिसर्या मंगळवारी पिंपरी जलसेन रस्त्यावर असणार्या खैराडी या मळगंगा देवी मंदिरात दरवर्षी प्रमाणे मळगंगा देवीचा पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. निघोज गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या खैराडी परिसरात मंळगंगा देवीचे छोटे मंदिर आहे.
गेली कित्येक वर्षांपासून गावातून पालखी सोहळा या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी देवीचा अभिषेक व पुजा करत आरती करण्यात आली. खैराडी परिसरातील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा उपस्थीतांनी लाभ घेऊन देवीचे व पालखीचे दर्शन घेतले.
पुन्हा हा पालखी सोहळा वाजत गाजत गावातील मंळगंगा देवीच्या मंदिरात येत पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. पारनेर, शिरुर, मुंबई परिसरातून भावीक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी आले होते.
पावसासाठी देवीला नवस
प्रत्येक वर्षी पाउसाने या पालखी सोहळ्याचे स्वागत होत असते यावर्षी मात्र पाउस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. असंख्य महिला भावीकांनी यावर्षी चांगला पाउस पडावा यासाठी मंळगंगा देवीला नवस केला असून पाउसासाठी प्रार्थना केली आहे. नवसाला पावणार्या मंळगंगा मातेच्या आशिर्वादाने पाउस नक्की पडेल अशी अपेक्षा महिला भाविकांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS