अहमदनगर | नगर सह्याद्री शेतकरी, व्यापारी हे बाजार समितीतील महत्वाचे घटक आहेत. बाजार समिती त्यातील एक दुवा आहे. त्या माध्यमातून नगर बाजार समि...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शेतकरी, व्यापारी हे बाजार समितीतील महत्वाचे घटक आहेत. बाजार समिती त्यातील एक दुवा आहे. त्या माध्यमातून नगर बाजार समिती राज्यात अग्रेसर आहे. यातून नगर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होत असून शहर विकासाला चालना मिळते. नगर बाजार समितीच्या आवारात सायंकाळचा भाजी बाजार सुरुझाला आहे. शेतकर्यांना त्याचा फायदा होईल असे प्रतिपादन आ. जगताप यांनी केले.
नगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालू राहणार्या भाजीपाला, फळे व फुले या बाजाराचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सचिन कोतकर, नगरसेवक निखील वारे, संचालक संतोष म्हस्के, सुधीर भापकर, दत्ता तापकिरे आदी बोलत होते.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, काही स्वयंघोषित राजकारण्यांनी स्वत:च्या राजकारणासाठी शेतकरी व व्यापारी अडचणीत येईल असे काम करू नये. त्यांची अवस्था पावसाळ्यातील भूछत्र्यासारखी आहे, निवडणुका आल्या की, जागे होऊन समाजात अपप्रचार पसरवण्याचे काम करतात. आता राजकारणात विश्वासार्हता नसलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. मार्केट यार्ड येथे रात्री भरणारा भाजी बाजार राज्यात नक्कीच नावलौकिक मिळवून देईल, या माध्यमातून शेतकर्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळेल. बाजार समितीने घेतलेला शेतकरी हिताचा निर्णय कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.
COMMENTS