अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहरात वेगवेगळी संपन्न उपनगरे उभी रहात आहेत. कन्स्ट्रो ग्राफ, कुबेर उद्योग समूह, राजापुरे असोसिएट्स यांनी नगरमध्य...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरात वेगवेगळी संपन्न उपनगरे उभी रहात आहेत. कन्स्ट्रो ग्राफ, कुबेर उद्योग समूह, राजापुरे असोसिएट्स यांनी नगरमध्ये प्रामाणिकपणे व्यवसाय करून नगरकरांचा विश्वास संपादन केलेला आहे. आता कुबेर लासिकच्या माध्यमातून उभी राहणारी वास्तू नगरच्या वैभवात भर घालणारी असेल असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. नगरच्या सावेडीतील गुलमोहर रोड वरील कलानगर चौकात ओम बेकर्स मागे असलेल्या प्रशस्त जागेत कुबेर लासिक या नावाने एका मजल्यावर एकच सदनिका या मुंबई पुण्याच्या धर्तीवर थ्री बी एच के अल्ट्रा लझरियस स्मार्ट फ्लॅट्स ची स्किम साकारण्यात येणार आहे.
नगरमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक इंजि. रमेश साळुंके, इंजि. प्रसन्न साळुंके यांचे कन्स्ट्रो ग्राफ, कुबेर उर्फ श्रीप्रसाद पतके यांचा कुबेर उद्योग समूह, आर्किटेट संतोष राजापुरे, यांचे राजापुरे असोसिएट्स प्रसिद्ध उद्योजक राजेश शिंदे, विधी सल्लागार संजय झव्हेरी यांच्या जॉईंट व्हेंचर द्वारे हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन श्रावण महिन्यातल्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील निवृत्त शास्त्रज्ञ नानासाहेब जाधव, धुमाळ उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक एन बी धुमाळ, ऍड. कारभारी गवळी, सी ए अजय गांधी, सागर गांधी , अर्जुनराव घुले, श्यामशेठ रेणावीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS