अहमदनगर | नगर सह्याद्री जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत सोमवारी भि...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत सोमवारी भिंगार येथील सकल मराठा समाजाच्या वतीने काळ्या फीती लावून नगर पाथर्डी रोड विजय लाईन चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीयम मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, किरण फटांगरे, गणेश सातकर, रमेश कराळे, पंकज चव्हाण, अंकुश शिंदे, गोरख चव्हाण, राहुल पानसरे, नंदकुमार भंडारे, दीपक लिपाने, संजय कापसे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, महेश झोडगे, कांता बोठे, मळूराज आवटी, विलास शिंदे, संपत बेरड, योगेश साळुंखे, राजेंद्र कडूस, अविनाश लांडगे, कैलास काटे, अरुण चव्हाण, अनिल तनपुरे, श्रवण काळे, तोडमल सर, नितीन हापसे, ऋषिकेश कापसे, खोमणे सर, विलास तोडमल आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून लवकरात लवकर सर्व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक यांनी महाराष्ट्र बंदला हाक देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी भिंगार मधील या रास्ता रोको ला मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला.
COMMENTS